स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.- मोटार सायकल स्वारास अडवून मारहाण व लुटमार करणारी टोळी जेरबंद.

Ahmednagar Breaking News
0

गणेश नगर, ता. राहाता येथे मोटार सायकल स्वारास आडवुन मारहाण व लुटमार करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.



      अहमदनगर,प्रतिनिधी. (01. नोव्हेंबर.):दिनांक 26/10/22 रोजी फिर्यादी श्री. नानासाहेब धनाजी बोरुडे वय 39, रा. निपाणीवडगांव, ता. श्रीरामपूर व त्यांचा मित्र श्रीरामपूर ते गणेशनगर मार्गे, शिर्डी येथे मोटार सायकलवर जात असतांना पाठीमागुन दोन मोटार सायकलवर अज्ञात चार इसमांनी येवुन फिर्यादीचे 1,70,000/- हजार रु.किंमतीची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावुन घेवुन गेले आहे. सदर घटने बाबत राहाता पोलीस स्टेशन गु.र.नं. 445/2022 भादविक 394, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

      सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.

      नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश इंगळे, सफौ/भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना/ शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक शिंदे व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशांना बोलावुन घेवुन नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले व पथकास लागलीच रवाना केले. पथक शिर्डी, राहाता व लोणी परिसरात पेट्रोलिंग फिरुन आरोपींचा शोध घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा आरोपी नामे ज्ञानेश्वर कुदनर व त्यांचे इतर साथीदारांनी मिळुन केला असुन ते बाबीर, ता. इंदापुर, जिल्हा पुणे येथुन यात्रेवरुन येणार असुन राहुरी रोडने गणेश नगर सहकारी साखर कारखाना येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी माहिती पथकास कळवुन खात्री करुन आरोपी ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या.

                पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी राहुरी रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना दोन मोटार सायकलवर काही इसम येतांना दिसले पोलीस पथकास संशय आल्याने त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच ते पळुन जावु लागले संशयीतांचा शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले व एक इसम पळुन गेला त्यांचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याची ओळख सांगुन त्यांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी त्यांची नावे 1) ज्ञानेश्वर गंगाधर कुदनर, वय-42, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव हल्ली रा. गणेशनगर सहकारी साखर कारखाना वसाहत, ता. राहाता 2) विजय लक्ष्मण खोतकर वय-42, 3) राजेंद्र लक्ष्मण खोतकर वय-39, दोन्ही रा. अशोक नगर, ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा पळुन गेलेल्या साथीदारासह केल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपींना राहाता पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील कारवाई राहाता पोलीस स्टेशन करीत आहे.

                   सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top