कोतवाली पोलिसांचा अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर समर्थनगर परिसरात तिरट नावाचा जुगारावर छापा.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर, समर्थनगर परीसरात तीरट नावाचा जुगारावर कोतवाली पोलिसांचा छापा.

अहमदनगर, प्रतिनिधी. (९,नोव्हेंबर.) :अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लोन येथे जुगार चालू असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक  संपतराव शिंदे  यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर समर्थनगर परीसरात काही इसम हे तीरट नावाचा हारजितीचा जुगार पैसे लावून स्वताचे फायदयासाठी खेळत व खेळवीत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे .कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तत्काळ एक पथक तयार केले. त्यामध्ये गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना/१२१२ रियाज इनामदार,पोकॉ अमोल गाडे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ सदिप(देवा) थोरात असे  सदर ठिकाणी जावून बातमीतील नमुद ठिकाणी बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर, समर्थनगर  समर्थनगर मधील पाण्याची टाकी जवळ लंकेश हरबाचे घराच्या पहिल्या मजल्याच्या रूम मध्ये अचानक २१.०० वा छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम गोलाकार आकारात बसलेले दिसले.हातातील पत्ते हे मध्ये डावात टाकलेले. त्यावेळी आम्ही त्यांना तसेच बसण्यास सांगुन त्यांना त्यांची नावे गावे विचारुन त्यांची झडती घेतली असता त्याचे ताब्यात रोख रक्कम व पत्ते मिळून आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला ,शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना/१२१२ रियाज इनामदार,पोकॉ अमोल गाडे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ सदिप(देवा) थोरात, पोकॉ.सुजय हिवाळे यांचा पथकामध्ये समावेश होता .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top