स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

  स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई.



अहमदनगर,प्रतिनिधी.(01. नोव्हेंबर.) :भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 06 आरोपीविरुध्द कारवाई करुन 2,88,200/- रुपये  (दोन लाख अठ्ठ्यांशी हजार दोनशे रु.) किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने व 4700 लि. कच्चे रसायन तसेच 532 लि. तयार दारु नाश. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, चापोहेकॉ/आंबादास पालवे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.30/10/22 रोजी व दि.31/10/22 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 06 ठिकाणी छापे टाकुन एकुण 2,88,200/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 06 आरोपीं विरुध्द  भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन -03 व एमआयडीसी पोलीस स्टेशन -03 असे एकुण महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये 06 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 

अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल

1. भिंगार कॅम्प 491/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1) संतोष गोवर्धन पवार रा. ब्रम्हतळे, भिंगार अ.नगर 80,000/- रु.किचे 1600 लि. कच्चे रसायन

6,000/- रु.किची 60 लि. तयार दारु

2. भिंगार कॅम्प 492/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 20,000/- रु.किचे 400 लि. कच्चे रसायन

2,700/- रु.किची 27 लि. तयार दारु

3. भिंगार कॅम्प 493/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1) गोकुळ ऊर्फ पप्पु अनिल पवार, रा. ब्रम्हतळे, भिंगार अ.नगर 25,000/- रु.किचे 500 लि. कच्चे रसायन

3,500/- रु.किची 35 लि. तयार दारु

4. एमआयडीसी 821/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1) किशोर विलास पवार, खातगांव टाकळी, ता. नगर 30,000/- रु.किचे 600 लि. कच्चे रसायन

3,000/- रु.किची 30 लि. तयार दारु

5. एमआयडीसी 822/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1) दिलीप माधव पवार, खातगांव टाकळी, ता. नगर 40,000/- रु.किचे 800 लि. कच्चे रसायन

3,000/- रु.किची 30 लि. तयार दारु

6. एमआयडीसी 823/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1) राहुल भाऊसाहेब गव्हाणे, रा. निंबळक, ता. नगर 35,000/- रु.किचे 800 लि. कच्चे रसायन

40,000/- रु.किची 350 लि. तयार दारु

एकुण

06 आरोपी 2,88,200/- रु. कि.ची 4,700 कच्चे रसायन, 532 लि. गावठी हातभट्टीची तयार दारु.

  सदरची कारवाई मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top