नगर शहरात कत्तलखान्यावर छापा अकराशे किलो गोमांस जप्त, तिघांना अटक.- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
अहमदनगर,प्रतिनिधी (१० नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 2,39,850/- (दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे पन्नास) हजार रु.किंमतीचे 1,100 (अकराशे) किलो गोमास,दोन जिवंत जनावरे व साधने कोठला,अहमदनगर येथुन स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच दोन पंचाना सोबत घेवुन कोठला परिसर, अहमदनगर येथील शहा स्टील फर्निचर शेजारील, हॉटेल कुरेशी मागे, पत्र्याच्या शेड जवळ जावुन खात्री केली असता 04 (चार) इसम जनावराची कत्तल करुन मास तोडताना व आजु बाजुला रक्त सांडलेले दिसल्याने पथक छापा घालण्याचे तयारीत असतांना नमुद इसमांना पोलीस पथकाची चाहुल लागताच एक इसम पळुन जावु लागला पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. इतर अंमलदारांनी 03 (तीन) इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मोसीन बाबामियॉ कुरेशी, वय 41, रा. कोठला, अहमदनगर, 2) सलीम बाकर कुरेशी, वय 19, रा. बेपारी मोहल्ला, अहमदनगर, 3) राजीक अफरोज कुरेशी, वय 19, रा. बेपारी मोहल्ला, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गोवंश कत्तलखान्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी सदर कत्तलखाना हा मोसीन बाबामियॉ कुरेशी हे चालवत असुन गोमांस विक्री करत असल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 1100 किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे, एक गाय, एक लहान वासरु व कत्तलीसाठी लागणारी हत्यारे असा एकुण 2,39,850/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर बाबत पोहेकॉ/ 440 संदीप कचरु पवार ने.स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन 986/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल 5 (क), (ब), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन,पुढील कारवाई तोफखाना पोस्टे करीत आहे. सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,मा.श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग, पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोसई/सोपान गोरे,सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण,संदीप पवार,संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी,पोना/सचिन आडबल, संदीप चव्हाण, पोकॉ/जालिंदर माने,मपोकॉ/सारीका दरेकर,चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.