मतदार यादीत आपले नाव आहे का.? - जिल्हाधिकारी डॉ. भोसले.

Ahmednagar Breaking News
0

मतदार यादीत आपले नाव आहे का.? - जिल्हाधिकारी डॉ.भोसले.


अहमदनगर, प्रतिनिधी (११. नोव्हेंबर.) : भारत निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ९ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप मतदार यादीत प्रत्येक मतदाराने आपले नाव आहे किंवा कसे याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. मतदारांनी मतदार यादीत नाव नसल्यास नमुना ६ भरून द्यावा.नावाच्या तपशिलात चूक असल्यास नमुना ८ दुरुस्ती अर्ज भरून द्यावा.प्रारूप मतदार यादीतील नावावर आक्षेप असल्यास आक्षेप घ्यावा.मतदारांनी मयत, दुबार, स्थलांतरित नावे वगळण्यासाठी पुढाकार घ्यावा.महिला मतदारांची नाव नोंदणी वाढविण्यासाठी सर्व महिला संघटनांनी सहभाग घ्यावा. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची नाव नोंदणीसाठी कॉलेजच्या प्राचार्यांनी शिबिर आयोजित करावे. मतदारांना आता दरवर्षी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ऑक्टोबर अशा चार अर्हता दिनांकानुसार नावनोंदणी करता येईल.१ऑक्टोबर २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे मतदार नावनोंदणीसाठी आगाऊ अर्ज देऊ शकतील. १० नोव्हेंबर २०२२ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून,त्यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दावे व हरकती दाखल करता येतील. नागरिकांच्या सोईसाठी १९ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, ३ डिसेंबर व ४ डिसेंबर रोजी मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महिला व दिव्यांग यांचे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी तसेच तृतीयपंथी, देहव्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटके विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी २६ व २७ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिर घेतले जाईल. मतदार नोंदणीसाठी पात्र युवकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्याचे व तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top