आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक दोन मधील भगवानबाबा चौक रस्ता कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ.

Ahmednagar Breaking News
0

आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक दोन मधील भगवानबाबा चौक रस्ता कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ.



सरकार बदलले तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही - आ. संग्राम जगताप.

नगर, प्रतिनिधी. (१२. नोव्हेंबर.) : राजकारणात निवडणुकीमध्ये एकमेकांवर टिका करणे, विरोध दर्शविणे हे सुरुच असते. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले, त्यांच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे, प्रत्येक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक विकास कामांना आघाडी सरकारच्या काळात मंजूरी देऊन कामे सुरु झाली. आज सरकार बदलले असले तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

निर्मलनगर ते संत नामदेव रोडवरील भगवान बाबा चौकातील रस्ता कॉक्रीटीरकरण कामाचा शुभारंभ आ.जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार, निखिल वारे, उद्योजक अनिल गीते, विलास शिरसाठ, शंकर सानप, राजु बगाडे, धीरज उर्कीडे, बाळासाहेब आंधळे, विश्वनाथ कुताळ, बबन नांगरे, उद्धव काळापहाड, मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, मनोज पारखे आदि उपस्थित होते.

आ.जगताप पुढे म्हणाले, उपनगरातील विकास कामांना स्थानिक नगरसेवकांनी महत्व दिले त्यामुळे अनेक कामे झाली. या भागात वस्ती वाढत आहे. सावेडी परिसरातील मुख्य रस्त्यांची कामे सध्या सुरु आहेत. काही कामे मंजूर झाली, ती सुरु असतांना सरकार बदलले त्यामुळे काही कामे अपुर्ण अवस्थेत असली तरी ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चौकातील हनुमान मंदिर, भगवानबाबा मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करु देऊ, असे आश्वासन दिले.

प्रास्तविकात बाळासाहेब पवार यांनी आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. चारही नगरसेवक एकत्र विकासासाठी कटीबद्ध असल्याने कामे सातत्याने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रभाग 2 हा आदर्श कामे म्हणून ओळखला जाईल, असे ते म्हणाले.

याप्रसंगी निखिल वारे, विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके आदिंनी मनोगत व्यक्त केली. कुलदिप भिंगारदिवे, हर्षल विधाते, सचिन लोटके, प्रसाद साळी, दिगंबर कुटे, धुमाळ सर, कदम साहेब, मोडमल साहेब, पालवे साहेब आदिंसह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top