लंडन येथील खासदार नवनीत ढोलकिया यांच्या हस्ते डॉ. बी.के दीपक हरके यांचा सन्मान.

Ahmednagar Breaking News
0

लंडन येथील खासदार नवनीत ढोलकिया यांच्या हस्ते डॉ.बी.के दीपक हरके यांचा सन्मान.



नगर,प्रतिनिधी. (११. नोव्हेंबर.) : ब्रिटिश पार्लियामेंट मधील हाउस ऑफ लॉर्डस मधील पॅलेस ऑफ वेस्टमिनस्टर मध्ये लंडन येथील खासदार नवनीत ढोलकिया यांच्या हस्ते डॉ. बी. के.दीपक हरके यांचा एक्ससिल्लेन्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.लंडन येथील ब्रिटिश पार्लियामेंट मधील हाउस ऑफ लॉर्डस मधील पॅलेस ऑफ वेस्टमिनस्टर ब्रिटीश पाल मध्ये WBR वेस्टमिनिस्टरमध्ये कॉर्पोरेशन यांच्या वतीने आयोजित बी.के.हरके यांचा इंडो यूके बिजनेस अवार्ड्सचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जगभरातील ३० व्यक्तींना एक्ससिल्लेन्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी लंडन येथील हाऊस ऑफ लॉर्ड्समधील लिबरल डेमोक्रॅट्सचे उपनेते खासदार नवनीत ढोलकिया यांच्या हस्ते प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ.बी.के. दीपक हरके यांचा एक्ससिल्लेन्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लंडन येथील राजयोगिनी ब्रह्माकुमारी रिचेल व ब्रह्माकुमारी दक्षा उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top