येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण शिक्षकांच्या विविध विषयांवर विधान परिषदेत आवाज उठवणार.- शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे.
अहमदनगर,प्रतिनिधी.(7.नोव्हेंबर.) : माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन 6 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे संपन्न झाले. आज शिक्षक आमदार मा.श्री. किशोर भाऊ दराडे यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष मा.श्री. महेंद्र गणपुले , अहमदनगर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा.श्री. सुनील पंडित सर, उपाध्यक्ष मा.श्री. मिथून डोंगरे सर, नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा.श्री. भाऊसाहेब रोहकले सर व मा.श्री. संभाजी पवार सर, मा.श्री भाऊसाहेब कचरे सर, मा.श्री. बाबासाहेब बोडखे सर, शिक्षक नेते वैभव सांगळे सर यांनी शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांचे स्वागत केले.तसेच शिक्षक आमदार यांनी राज्यातील विविध भागातून आलेल्या सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.तसेच येणाऱ्या काळात संघटना महत्वाच्या आहेत, असे शिक्षक आ.दराडे म्हणाले.त्यांनी जुनी पेंशन,घोषित आणि अघोषित शाळा अनुदान, मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण विधान परिषदेत शिक्षकांच्या विविध विषयावर आवाज उठवणार आहोत असे शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे म्हणाले.