प्रेमदान चौकातील म्हाडाच्या व्यावसायिक ४० गाळ्यांसाठी अपेक्षा पेक्षा जास्त प्रमाणात निविदा विक्री.- गोरख कडूस, म्हाडा,सहाय्यक वसुली अधिकारी.

Ahmednagar Breaking News
0

प्रेमदान चौकातील म्हाडाच्या व्यावसायिक ४० गाळ्यांसाठी  अपेक्षा पेक्षा जास्त प्रमाणात निविदा विक्री.- गोरख कडूस, म्हाडा,सहाय्यक वसुली अधिकारी.

नगर,प्रतिनिधी.(१६. नोव्हेंबर.) : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत (म्हाडा.) शहरातील प्रेमदान चौकात बांधण्यात आलेल्या 40 व्यावसायिक गाळ्यांची गुरुवारपासून दिनांक 10 नोव्हेंबर पासून निविदा विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे. आज पर्यंत म्हाडाने अहमदनगर शहरात व उपनगरात ज्या ज्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधले त्यांना भेटलेल्या प्रतिसादापेक्षा मोठ्या प्रमाणात प्रेमदान चौकातील गाळ्यांच्या निविदा विक्री झाल्या आहेत असे म्हाडाचे अहमदनगर येथील सहाय्यक वसुली अधिकारी गोरख कडूस यांनी सांगितले. 9 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 पर्यंत निविदा विक्री प्रक्रिया सुरू असेल. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी1.30. पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोन पासून शाळेतील माऊली सभागृह येथे इन कॅमेरा व सरकारी पंचा समक्ष निविदा उघडल्या जाणार आहेत असे म्हाडाच्या कार्यालयातून सांगण्यात आले. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top