लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावूनचे वतीने जागतिक मदुमेह दिना निमित्त शिबीर संम्पन्न.

Ahmednagar Breaking News
0

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावूनचे कार्य कौतुकास्पद. - महापौर सौ. रोहिणी शेंडगे.

नगर, प्रतिनिधी. (१५. नोव्हेंबर.) : लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावूनच्या वतीने जागतिक मदुमेह दिना निमित्त मोफत तपासणी शिबीर रेवती नर्सिंग होम, वैभव कॉलोनी, वैदूवाडी येथे डॉ. शरद ठुबे व डॉ. सौ. कल्पना ठुबे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झाले या वेळी प. पु. माताजी श्री.निर्मलादेवी प्रणित सहजयोग परिवारातील अमरावती येथील आंतरराष्ट्रीय संगीतकार श्री. संदीप दलाल क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, संस्थापक श्रीकांत मांढरे, प्रोजेक्ट चेअरमन सौ. छाया रजपूत,  श्री. प्रसाद मांढरे, संदीप चौहान, सौ. सुनंदा तांबे, सौ. स्वाती जाधव, अरविंद साठे, श्री. नरेंद्र मुळे, राजेंद्र म्याना व डॉ श्री. व सौ. ठुबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

           यावेळी बोलतांना महापौर शेंडगे म्हणाल्यात आज जागतिक मदुमेह दिन असून आज लायन्स क्लब च्या वतीने जे शिबीर आयोजित केले हे नागरिकांसाठी तसेच मदुमेह रुग्णासाठी फार गरजेचे व आवश्यक आहे. दिवसेंदिवस महागडी उपचार पद्धती व महागड्या औषधमुळे रुग्ण उपचार घेण्यास पुढे येत नाही. या मोफत शिबिरामुळे सर्वच स्तरातील रुग्णांना व जनतेला याचा फायदा होईल. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून चे कार्य कौतुकास्पद आहे.

           या वेळी क्लब चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी क्लब बद्दल माहिती देऊन क्लब सामाजिक बांधिलकी म्हणून अहमदनगर शहरामध्ये कार्य करीत असून यांस नागरिक व प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. या वेळी क्लब चे संस्थापक श्रीकांत मांढरे यांनी क्लब ने गेल्या 30 वर्षांपासून केलेल्या कार्याची माहिती दिली. डॉ. शरद ठुबे व डॉ.कल्पना ठुबे यांनी मधुमेह बद्दल माहिती देऊन होमिओपॅथी औषध या साठी किती महत्वाचे या बाबत माहिती दिली. या शिबिराचा लाभ अनेक रुग्णांनी व नागरिकांनी घेतला.


कार्यक्रमाचे स्वागत सौ. सुनंदा तांबे यांनी केले, सूत्रसंचालन प्रसाद मांढरे यांनी केले तरं आभार संदीप चौहान यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top