स्थानिक गुन्हे शाखेने सात दुचाकी व एक ॲपल कंपनीचा मोबाइल चोरणाऱ्याला मुद्देमालासह केली अटक.
अहमदनगर,प्रतिनिधी .(१८.नोव्हेंबर) : केडगांव,सुपा व शिरुर जिल्हा पुणे येथुन मोटार सायकल व मोबाईल चोरी करणारे आरोपी 2,85,000/- रु.किं.चे 07 (सात) मोटार सायकल व 01 (एक) ऍ़पल कंपनीचे मोबाईल फोनसह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
घटनेतील बातमीची हकिगत अशी की,दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 11.00 वा ते दिनांक 18/11/2022 रोजी 07.00 वा.दरम्यान फिर्यादी श्री. संकेत विठ्ठल सातपुते (वय 22,धंदा शिक्षण,रा.अर्चना हॉटेल मागे,नेप्तीरोड,सातपुते गल्ली,केडगांव, अहमदनगर) यांनी घरासमोर लावलेली 15,000/- रु.किं.ची सुझूकी कंपनीची ऍ़क्सेस मोपेड मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वत:चे फायद्या करीता लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली होती.सदर घटने बाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 829/22 भादविक 379 प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे करीता विशेष पथक नेमुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये ना उघड मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत पोलीस निरीक्षक कटके यांनी सुचना व मार्गदर्शन करुन पथकास तात्काळ रवाना केले.पथक पेट्रोलिंग करुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे फरहान खान रा. मुकूंदनगर, अहमदनगर हा साथीदाराचे मदतीने अहमदनगर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवरुन मोटार सायकल चोरी करुन विक्री करतो तो मुकूंदनगर येथील त्याचे राहते घरी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मुकूंदनगर येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवुन हिनापार्क, मुकूंदनगर, अहमदनगर येथील आरोपीचे घराचे आजु बाजूस सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे दिसणारा एक संशयीत इसम येतांना दिसला.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव 1) फरहान फिरोज खान,वय 21,रा.हिनापार्क,मुकूंदनगर, अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्याचेकडे वर नमुद मोटार सायकल चोरीचे गुन्ह्याबाबत विचारपुस करता तो समाधान- कारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह दीड ते दोन महिन्यापुर्वी अहमदनगर, सुपा व शिरुर येथुन चोरी केल्याची कबुली दिली.आरोपीकडे साथीदाराचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितल्याने त्याचा दिले पत्त्यावर जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने तो विधीसंघर्षीत बालक असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर व पुणे जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता खालील प्रमाणे एकुण 03 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहेत.
अ.क्र.पोलीस स्टेशन गु.र.नं.
1.कोतवाली 829/22 भादविक 379
2.सुपा 373/22 भादविक 379
3.शिरुर, जिल्हा पुणे 651/22 भादविक 379
तक्त्यात नमुद दाखल गुन्ह्यात चोरी केलेले 2,85,000/- रु.किंमतीचे विविध कंपनीच्या 07 (सात) मोटार सायकल व 01 (एक) ऍ़पल कंपनीचा मोबाईल फोन आरोपीचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.अनिल कातकाडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग,श्री. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोसई/सोपान गोरे,सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,भिमराज खर्से, रवि सोनटक्के,दिपक शिंदे,पोकॉ/योगेश सातपुते, जालिंदर माने, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/बबन बेरड यांनी केलेली आहे.