सैन्य दलातील एन.ओ.सी. प्रकरणातील राजा ठाकूर याला जामीन मंजूर.

Ahmednagar Breaking News
0

सैन्य दलातील एन.ओ.सी.प्रकरणातील राजा ठाकूर याला जामीन मंजूर.

अहमदनगर, प्रतिनिधी. (१९. नोव्हेंबर.) : सैन्यदलातील स्टेशन हेडकॉर्टर,अहमदनगर अंतर्गत काही बनावट कार्यालयीन पत्रव्यवहार कार्यालयाचे सही शिक्यासह केल्याचे निदर्षणास आले व त्याबाबतचा गुन्हा नोंदविण्यासाठी उपविभागीय अधिकारी,अ.नगर यांचे सांगणेवरुन कोतवाली पो.स्टे. चे पोलीसांनी राजेंद्र देसराज सिंग उर्फ राजा ठाकुर व इतर ३ यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम ४२०, ४६४, ४६५, ४६७,४६८, ४७१ व ४७२ प्रमाणे गुन्हा रजि. नं. ।-७५२/२०२२ चा दाखल केला होता.त्यानंतर पोलीसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी राजा ठाकुर व इतर यांना अटक करुन अहमदनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले.सदर गुन्ह्यातील आरोपीस पोलीसांनी अटक केली. सदर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर येथे ॲड.महेश तवले व ॲड. संजय दुशिंग यांचे मार्फत अर्ज केला.

       


          सदर अर्जाचे कामी आरोपीचे वकीलांनी युक्तीवाद करुन आरोपीची बाजु मांडली व न्यायालयास निदर्षणास आणुन दिले की,आरोपी राजा ठाकुर यांचेकडून पोलीसांना कुठलाही पुरावा प्राप्त झाला नाही व  गुन्ह्यात वापरलेले एन.ओ.सी., रबर स्टॅम्प याची देखील आरोपी यांचेकडून जप्ती झालेली नाही, त्यामुळे गुन्ह्यातील लागु केलेली कलमे ही आरोपी यांना लागु होत नाहीत, आरोपीचा गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही, केवळ संशयाने आरोपी यांना अटक केलेले आहे. गुन्हा हा कागदपत्रांशी संबंधीत असून आरोपी यांचे प्रत्यक्ष ताब्याची आवश्यकता नाही ही बाब न्यायालयाचे निदर्षणास आणुन दिली.सरकार पक्षातर्फे आरोपी यांचे वकीलांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे व  आरोपीचा गुन्ह्यात सहभाग आहे, आरोपीला गुन्ह्यातील सर्व हकीकत माहिती आहे अशी बाजु मांडली. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण मा. न्यायालयाने असे मत व्यक्त केले की, आरोपी राजा ठाकुर यांचे पोलीस तपासात काहीही पुरावा प्राप्त झालेला नाही व बनावट कागदपत्रे ताब्यात घेतलेली आहेत, साक्षीदारांचे जबाब नोंदविलेले आहेत,सदर केस ही बनावट कागदपत्राचे तपासावर निर्धारीत आहे त्यामुळे आरोपीस जामीन देण्यात येत आहे.

              आरोपीतर्फे ॲड. महेश तवले व ॲड.संजय दुशिंग अहमदनगर यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top