यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैद्य वाळू उत्खनन व वाहतुकी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Breaking News
0

यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैद्य वाळू उत्खनन व वाहतुकी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.




अहमदनगर प्रतिनिधी. (2. नोव्हेंबर.) : खेड, ता. कर्जत येथील भिमा नदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची धडक कारवाई.

      प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.

       नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, पोकॉ/रोहित मिसाळ, विनोद मासाळकर, योगेश सातपुते व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर असे कर्जत तालुक्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तेजस मोरे व चाँद शेख हे परप्रांतीय मजुरांचे सहाय्याने खेड, ता. कर्जत गांवचे शिवारातील भिमा नदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीचे सहाय्याने अवैध वाळु उत्खनन व वाळु वाहनात भरुन वाहतुक करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. 

       पोनि/अनिल कटके यांनी नमुद माहिती लागलीच पथकास कळवुन महसुल कर्मचारी व पंच यांचेसह खात्री करुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या. नमुद सुचनां प्रमाणे पथकातील पोलीस अंमलदार यांनी महसुल कर्मचारी व पंच असे खेड, ता. कर्जत येथे नदीपात्रा जवळ जावुन स्पिडबोट सोबत घेवुन अवैध वाळु उत्खनन करणारे बोटीचे शोध घेता खेड गांवाचे शिवारात भिमानदी पात्रात 1 (एक) यांत्रिकी बोट व 1 (एक) सेक्शन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळु उत्खनन/उपसा करतांना दिसले. पथक सदर बोटच्या दिशेने जावुन यांत्रिकी बोटर छापा टाकुन बोटीवरील इसमांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांचे गांव विचारले असतां त्यांनी त्यांची नावे व पत्ते 1) सुकरदी मंजुर शेख वय 32, 2) फारुख रोहिम शेख वय 32, दोन्ही रा. पहाडगांव, ता. उधवा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत, 3) रफिकूल ऊर्फ इस्माल मुस्ताफा शेख वय 30 व 4) रेजाऊल माजद शेख वय 24, दोन्ही रा. बाघपिंजरा, ता. मोहनपुरा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे नमुद यांत्रिकी बोट कोणाच्या मालकीची आहे अशी विचारणा केली असता त्यांनी 5) तेजस मोरे रा. खेड, ता. कर्जत व 6) चाँद शेख रा. वाटलुज, ता. दौंड, जिल्हा पुणे यांच्या मालकिची असुन आम्हाला बोटीवर रोजंनदारीवर कामाला ठेवले आहे असे सांगितल्याने वरील सर्व आरोपींनी संगनमताने अवैधरित्या भिमानदी पात्र जलाशयातुन यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने अ.क्र. 1 ते 4 यांना 9,00,000/- (नऊ लाख रु.किंमतीचे) एक यांत्रिकी फायबर बोट पाण्यात बुडविली व एक सेक्शन पंपा ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. 699/2022 भादविक 439, 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.

              सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. आण्णासाहेब जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top