वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव, सभासदांनी केलेले धरणे आंदोलन अखेर स्थगित.

Ahmednagar Breaking News
0

वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित.शेवगाव, सभासदांनी केलेले धरणे आंदोलन अखेर स्थगित.

अहमदनगर,प्रतिनिधी. (९ नोव्हेंबर.) : वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव, या संस्थेने बेकायदेशीररित्या काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती देऊन पूर्वीप्रमाणे सभासदत्व बहाल करण्याबाबत धरणे आंदोलन दि.०९.नोव्हेंबर रोजी  मा.जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर सभासदांनी केले होते. त्यानंतर सभासदांची आणि मा. जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर यांच्या दालनात चर्चा झाली.त्यात वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगावचे विद्यमान चेअरमन, तज्ञ संचालक व कार्यकारी संचालक यांना आंदोलनकर्त्यांनी नोटीस द्वारे मागितलेली संपूर्ण माहिती देण्यात यावी असे आदेश दिल्यामुळे संस्थेने आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून दिल्यामुळे आज सुरु केलेले धरणे आंदोलन स्थगित करीत आहोत असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top