अविस्मरणीय रंगभूमी दिन माऊली सभागृह आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद यांच्यावतीने साजरा.
अहमदनगर, प्रतिनिधी. (7, नोव्हेंबर.) - माऊली सभागृह आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा यांच्या वतीने दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत नाट्य, नृत्य, संगीत, यावर आधारित शहर व जिल्ह्यातील प्रमुख संस्था आणि कलाकार यांच्या सहभागातून अविस्मरणीय कार्यक्रमाच्या आयोजनातून रंगभूमी दिन एक आनंद सोहळा साजरा करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्था एकाच वेळी एका व्यासपीठावर एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा असे माऊली सभागृहचे चेअरमन श्री.दिनकर घोडके आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री.अमोल खोले यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मंत्रोच्चार व विधिवत पूजन करून झाली.नटराज पूजन श्री.प्रमोद कांबळे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष सौ.उर्मिला लोटके, श्री.धनेश बोगवत , रंगमंच पूजन सौ.धनश्री खरवंडीकर, श्री.पवन नाईक, श्री.राम शिंदे यंत्रसामग्री पूजन श्री.जयंत येलूलकर, श्री.क्षितिज झावरे, सौ.सुप्रिया ओगले-जोशी, यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय चित्रपट विजेते "कुंकुमार्चन" लघुपटाच्या सर्व कलाकार व तंत्रज्ञ तसेच "योग योगेश्वर जय शंकर' मालिकेतील बाल कलाकार आरुष बेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. आरुष बेडेकर यांचा सत्कार श्री.प्रसाद बेडेकर, सौ अमृता बेडेकर यांनी स्वीकारला.
प्रास्ताविक नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री.अमोल खोले यांनी केले, श्री.दिनकर घोडके, श्री.म्हातारदेव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात गीतानंद फाउंडेशन यांनी नांदी सादर केली तर नृत्यझंकार अकॅडमीच्या अनुष्का बेद्रे, सानिया गोडसे, ऋषाली मुनोत, वैष्णवी कांडेकर, सिध्दी चोरबेले, समृध्दी फिरोदिया यांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. श्रुती संगीत निकेतन, गुरुमाऊली संगीत विद्यालय, यांनी समूहगीत सादर केले. उत्तरोत्तर बहरत गेलेल्या या कार्यक्रमात तेजस्विनी शेळके हिचे नृत्य, श्री.दिनेश मंजरतकर , श्री.सारंग पंधाडे, श्री.अजय दगडे, श्री.गिरीराज जाधव यांच्या गीतांनी रंजकता वाढली. नादब्रम्ह संगीत विद्यालय श्री.पावन नाईक आणि कल्याण मुरकुटे, प्राजक्ता उकिर्डे, शेखर दरवडे, कुलदीप चव्हाण, श्रेयसस शित्रे, पवन तळेकर, संकेत गांधी, राहुल सिसोदिया यांनी बहारदार गायन कार्यक्रम सादर केला.
अंतरा प्रोडक्शन अहमदनगर यांनी "नाना थोडं थांबा" ही विनोदी एकांकिका ऋषी हराळ, प्रदुम्न गायकवाड, निवृती गर्जे, कान्हा तिवारी, सौंदर्या भोज, स्नेहल गटणे सादर करण्यात आली. तर राहुरीचे रेखांकित क्रिएशन या संस्थेचे प्रशांत सुर्यवंशी, विशाल तागड, देविदास जगधने यांनी रंगमंचाचे सुंदर पेटींग भेट दिले.
कार्यक्रमाचे स्वागत श्री.सुनील राऊत यांनी, सूत्रसंचालन श्री.सागर मेहेत्रे यांनी केले तर आभार नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्री.सतीश लोटके यांनी केले अशी माहिती उपाध्यक्ष श्री.शशिकांत नजान यांनी दिली.
या कार्यक्रमास संस्कार भारतीचे दीपक शर्मा, सतीश शिगंटे, श्रेणीक शिंगवी, अनंत जोशी, शाम शिंदे, अमीत बैचे, चैत्राली जावळे, कृष्णा वाळके, विद्या जोशी, सागर खिस्ती, सुज्ञ टोम्पें व अनेक कलावंत यावेळी ऊपस्थित होते.
कार्यक्रमास माऊली सभागृहचे संचालक हरिभाऊ भालेराव, सुरेश तारडे, व्यवस्थापिका श्रीमती. पी. के. सुर्यपुजारी, वाचनालय अध्यक्ष बाबासाहेब हिंगे, श्रीनिवास आव्हाड, वसतीगृहाचे तुकाराम सुतार, रावसाहेब निमसे, शंकर जावळे, आसाराम रोकडे, राधुजी शिगांडे उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाट्य परिषद संचालक सर्वश्री कोषाध्यक्ष तुषार चोरडिया, सहकार्यवाह सागर मेहेत्रे, राजू ढोरे, नाना मोरे, गणेश लिमकर, अभिजीत दरेकर, शैलेश देशमुख, योगेश विलायते, यांनी परिश्रम घेतले.