जिल्ह्यात अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांसह मद्य पिणाऱ्या व्यक्तींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

जिल्ह्यात अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांसह मद्य पिणाऱ्या व्यक्तींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करण्याचे आवाहन.

अहमदनगर,प्रतिनिधी.(25.नोव्हेंबर) : जिल्हयात अवैध मद्यविक्री करणारे हॉटेल्स, धाबे, चायनिज गाडया आदी ठिकाणी होत असलेल्या सहा अवैध मद्यविक्री विक्रेत्यांवर तसेच तेथे मद्य पिणारे व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत  दंडात्मक कारवाई करत दंड वसुल केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असुन परिसरात तसेच गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.

            अवैध मद्यविक्री करणारे तसेच मद्य पिणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जिल्हयात सर्वत्र कारवाया सुरु असुन या कारवाईमध्ये न्यायालयाने आदेश पारित केलेले आहेत. अवैध दारुविक्री करणारे हॉटेल मालकावर मद्य पिण्यास जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे जागा मालकास द्रव्यदंडाची शिक्षा सुनावणी असून सदर अवैध ठिकाणी मद्यपान करीत असलेल्या व्यक्तींनाही दंडाचे स्वरुपात शिक्षा सुनावलेली आहे.

            या कारवाईमध्ये हॉटेल साहिबा, कायनेटीक चौक, अहमदनगर या  हॉटेल मालकास २५ हजार रुपयांचा  दंड तर त्या ठिकाणी मद्य पिणाऱ्या एकूण ४ व्यक्तींना प्रत्येकी रुपये १०० रुपयांचा  दंड आकारण्यात आला आहे. हॉटेल पंजाबी ढाबा, शेवगांव पैठण रोड, खानापूर ता. शेवगांव येथे मद्य पिणाऱ्या एकूण ३ व्यक्तींवर कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हॉटेल विजय, घोडेगांव कुकाणा रोड, ता. नेवासा या ठिकाणी मद्य पिणाऱ्या एकूण तीन  व्यक्तींना प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचा  दंड आकारण्यात आला आहे. हॉटेल संकल्प, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर येथील हॉटेल चालकास २५ हजार रुपयांचा दंड आकारत या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या एकूण ९ व्यक्तींकडून प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हॉटेल शेवटी नशिब, खिरविरे, ता. अकोले येथील हॉटेल मालकास २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येऊन त्या ठिकाणी मद्य पिणाऱ्या तीन व्यक्तींकडून प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर मनोहर वाईन्स, शेजारी रंगारगल्ली, अहमदनगर,  हॉटेल चंद्रमा, ताठे मळा, सावेडी ता. जि. अहमदनगर व हॉटेल जत्रा, नगर पुणे रोड, चास ता.जि. अहमदनगर यांच्यावर कारवाई करत न्यायालयाकडून  आदेश प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

            जिल्हयात यापुढेही सर्वच ठिकाणच्या  ढाबे, हॉटेल्स आदी  ठिकाणी  सुरु असलेल्या अवैध मद्य विक्रीवर तसेच हॉटेल मालक, चालक व त्या ठिकाणी मद्य पिणा-या व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाया करुन अशा अवैध मद्यविक्रीचे समूळ उच्चाटन करण्याची कारवाई राज्य उतपादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. येत्या नववर्षाच्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील अवैध मद्यविक्री करणारे हॉटेल्स, धाब्यांवरही कारवाई केली जाणारअसुन जनतेने अशा अवैध मद्यविक्री ठिकाणी मद्यपान करु नये. तसेच आपल्या परिसरात तसेच गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ २) व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ या ठिकाणी तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top