महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह अनोळखी तीन इसमानवर भिंगार कॅम्प मध्ये गुन्हा दाखल.
अहमदनगर,प्रतिनिधी (दि.२६ नोव्हेंबर) : अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्या प्रकरणी एका पॅगो रिक्षा चालकासह मनपा माजी नगरसेवक शेख मुददसर इसाक अहमद व इतर तीन अनोळखी इसमानवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील कोठला स्टॅन्ड परिसरात मध्ये मनपाचे स्वच्छता निरिक्षक राजेश प्रकाश तावरे हे त्यांचे शासकीय कामकाज करत असताना यातील आरोपी यांनी राजेश तावरे यांच्याबरोबर शाब्दिक बाचाबाची केली आणि त्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद राजेश तावरे यांनी भिंगार पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून माजी नगरसेवकासह पॅगो रिक्षा चालकावर भादविक 353,143,323, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करत आहेत.