काल्याच्या कीर्तनाने पानसवाडीतील श्री. संत गुलाबबाबा ग्रंथ पारायणाची सांगता.
नगर, प्रतिनिधी. सोनई-घोडेगाव रोडवरील पानसवाडी येथे श्री संत गुलाबबाबा व विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री संत गुलाबबाबा यांचे ग्रंथपारायण सोहळा पार पडला. यावेळी पहाटे काकडा भजन, सकाळी पारायण वाचन, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकिर्तन, असे कार्यक्रम पार पाडले.
श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबा यांची संगीतमय चरित्रकथा ऐकण्यास पंचक्रोशितील भाविकांनी गर्दी केली होती. ग्रंथ दिंडी व बाबांच्या पादुकांची पालखीतून मिरवणुक काढण्यात आली. हभप गजानन महाराज दहिकर यांच्या सुमधूर कथा श्रवणाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
या तीन दिवसाच्या सप्ताहाची हभप दहिकर महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता झाली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ.शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर उमक, सोनू भाटिया आदिंसह मान्यवर व्यक्तींनी कार्यक्रमास हजेरी लावली.
श्री. सुनिल गडाख, उदयन गडाख, महंत सुनिलगिरी महाराज,तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे कारभारी लोडे यांनी आभार मानले..