श्री.मोहटादेवी गडावर "त्रिपुरारी पोर्णिमा" निमित्त श्री.तुळशी विवाह.

Ahmednagar Breaking News
0

श्री.मोहटादेवी गडावर "त्रिपुरारी पोर्णिमा" निमित्त श्री.तुळशी विवाह.


अहमदनगर,प्रतिनिधी.(6, नोव्हेंबर.) : श्री.जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे,ता.पाथर्डी,जिल्हा अहमदनगर. येथील श्री.क्षेत्र मोहटादेवी गड येथील मंदिरात "त्रिपुरारी पौर्णिमा"निमित्त सायं.6.00.वाजता श्री. तुळशी विवाह होईल.तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.त्यानंतर सायं.7.40.वा. महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी.रात्री 9.00 ते 11.00. यां वेळेत ह. भ. प.आसाराम महाराज बडे, विश्वस्त जोग महाराज वारकरी संस्थान,आळंदी (देवाची) यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित केलेले आहे. असे श्री.जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे यांच्याकडून सांगण्यात आले. अहमदनगर येथील भाविक मनोज शर्मा हे मंदिरात फुलांची सजावट करून आकर्षक रांगोळी काढणार आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top