जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याचे आरोप असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर.

Ahmednagar Breaking News
0

जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याचे आरोप असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर.

अहमदनगर, प्रतिनिधी. (२०. नोव्हेंबर.) : राहुरी पो.स्टे., जि. अहमदनगर येथे दि. २८/१०/२०२२ रोजी भा.द.वि. कलम ३५४ड व अनु.जा.ज.कायदा कलम३(१)(w)(i), ३(१)(r), ३(१)(s) अन्वये पिडीत महिलेने बाचकर यांचे विरुद्ध आरोप करुन तसा गुन्हा नोंदविला होता. पिडीत महिलेने त्यात म्हंटले होते की,आरोपी इसम हे त्यांची जनावरे धुत असलेले पाणी तिचे घरासमोर आल्यामुळे तिने जनावरे दुसरीकडे धुवा असे सांगितले असता आरोपींना त्याचा राग येऊन त्यांनी पिडीत महिलेस जातीवाचक शिवीगाळ केली व विनयभंग केला, हा प्रकार पिडीत पिडीत महिलेने तिचे भावास सांगितला असता आरोपींनी त्यास देखील शिवीगाळ करुन मारहाण केली.गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुर पो.स्टे. चे पोलीसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली म्हणून आरोपींनी अहमदनगर येथील . ॲड. महेश तवले,ॲड. संजय दुशिंग व ॲड.अक्षय दांगट यांचे मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर येथे जामीन मिळणेसाठी अर्ज सादर केला.

             सदर अर्जाचे कामी आरोपीचे वकीलांनी युक्तीवाद करुन आरोपीची बाजु मांडली व न्यायालयास निदर्षणास आणुन दिले की, गुन्हा हा खोटा असून तो नोंदविण्यास मोठा विलंब झाला असून केवळ जनावरे धुतलेले पाणी घराचे समोरआल्याचा राग मनात ठेऊन नोंदविलेला आहे, तसेच सदरची घटना ही सार्वजनिक ठिकाणी (Public view) घडलेला नाही.त्यामुळे अनु.जा. ज. कायदा लागु होत नाही.

             सरकार पक्षातर्फे आरोपी यांचे वकीलांनी गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे व आरोपींना अटक करणे आवश्यक आहे तसे न झाल्यास ते गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणतील असा युक्तीवाद केला.दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुण मा. न्यायालयाने असे मत व्यक्त केले की,पिडीतेने तक्रारीत गुन्हा घडला त्या ठिकाणी इतर व्यक्तींच्या उपस्थितीबाबत उल्लेख केलेला नाही, गुन्हा सार्वजनिक ठिकाणी घडला नाही, अनु. जा. ज. का. कलम १८चा बार लागु होत नाही त्यामुळे आरोपीस जामीन देण्यात येत आहे.

             आरोपीतर्फे ॲड. महेश तवले,ॲड.संजय दुशिंग व ॲड.अक्षय दांगट यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top