स्थानिक गुन्हे शाखेकडून पारनेर येथे आठ महिन्यापूर्वी घडलेल्या खुनातील आरोपीस अटक.
अहमदनगर, प्रतिनिधी.(३नोव्हेंबर) : पारनेर येथील आठ महिन्यापुर्वी घडलेल्या खुना सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकिस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा यांना यश आले आहे.प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 23/02/2022 रोजी फिर्यादी श्री.राहुल राजु लाळगे,वय 27,धंदा हॉटेल व्यवसाय,रा.निघोज,ता. पारनेर यांनी त्यांचे हॉटेल मंथन मध्ये वेटर म्हणुन काम करणारा मन्सुर अन्सारी रा.उत्तर प्रदेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने कोणत्यातरी हत्याराने गळ्यावर वार करुन जिवे ठार मारुन पाडळी आळे,ता. पारनेर गावचे शिवारात,कळस गांवाकडे जाणारे रोडलगत रस्त्याचे कडेला शेतामध्ये मृतदेह टाकुन दिला होता.या घटने बाबत पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 130/2022 भादविक 302,201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.खुना सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा मागील आठ महिन्यापासुन उघड न झाल्याने श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी सदर गुन्ह्याचा झालेल्या तपासाचा आढावा घेवुन खुनाचे गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करणे करीता पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अमलदार अशांना बोलावुन घेवुन नमुद ना उघड खुनाचे गुन्ह्याचे गांभीर्य समजावुन सांगुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले व पथकास लागलीच रवाना केले. पथक निघोज,देवीभोयरे,वडझिरे,लोणीमावळा, अळकुटी, पाडळीआळे ता. पारनेर तसेच बेल्हे,राजुरी व आळेफाटा, ता.जुन्नर,जिल्हा पुणे परिसरात आरोपींचा शोध घेणे कामी पेट्रोलिंग करुन गुन्ह्याचा सखोल तपास करत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,वर नमुद गुन्हा संशयीत इसम नामे राजु औटी,रा.वडझिरे,ता. पारनेर याने केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.कटके यांनी माहिती पथकास कळवुन आरोपी ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या.विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करुन संशयीत इसम नामे राजु औटी रा. क्रांती साखर कारखान्या जवळ,देवीभोयरे,ता. पारनेर यांचे घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम रस्त्याने पायी येतांना दिसला पोलीस पथक शिताफीने त्यास ताब्यात घेण्याचे तयारी असतांना संशयीतास पोलीस पथकाची चाहुल लागताच पळुन जावु लागला पथकाने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथक असल्याची ओळख सांगुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यास अधिक विश्वासात घेवुन कसुन चौकशी करता त्याने त्याचे नावे राजु ऊर्फ राज प्रभाकर औटी, वय 46 रा.क्रांती साखर कारखान्या जवळ, देवीभोयरे, ता.पारनेर असे असल्याचे सांगितले.त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.नमुद कबुली बाबत तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास करुन सदरचा गुन्हा हा आरोपीने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पारनेर पोस्टे येथे हजर केले असुन पुढील कारवाई पारनेर पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी नगर ग्रामीण विभाग,श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/गणेश इंगळे,पोसई/सोपान गोरे,सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/संदीप पवार,संदीप घोडके, देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,रवि सोनटक्के,विशाल दळवी,संतोष लोढे,दिपक शिंदे,पोकॉ/मेघराज कोल्हे, मपोकॉ/भाग्यश्री भिटे,सारीका दरेकर,ज्योती शिंदे, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व संभाजी कोतकर यांनी केली आहे.