भिंगार कॅम्प पोलिसांनी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या आरोपीस सांगलीतून केली अटक.
अहमदनगर,प्रतिनिधी.(८ नोव्हेंबर) : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलीसांनी सांगलीतून अटक केली आहे.दि.31/10/2022 रोजी सायं.6/00 वा.सुमा. अल्पवयीन मुलगी हीस अज्ञात इसमाने पळवून नेले बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरनं 497/2022 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील पिडीत मुलगी ही ता.आष्टा जि.सांगली येथे असल्याचे गोपनिय बातमदारा मार्फत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनी.श्री. शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली त्यांनी लागलीच पो स्टेचे मपो.उपनिरीक्षक शितल मुगडे यांना बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून पिडीत मुलगी व अज्ञात आरोपी यास ताब्यात घेणे बाबत पोलीस अंमलदारांना आदेश दिल्याने वरील पोलीस अधिकारी व अंमलदार असे इस्लामपुर,बावसी, गोटखिंड,येडे निपाणे तसेच आष्टा पोलीस स्टेशन हद्द ता.वाळवा जि.सांगली परीसरात शोध घेतला असता पीडीत मुलगी व आरोपी योगेश कचरू गायकवाड (वय 20 वर्षे रा.फुलसौंदर मळा,बुरुडगाव रोड,ता.जि.अहमदनगर) यांना गोटखिंड ता.वाळवा जि.सांगली येथून ताब्यात घेऊन यातील आरोपी यास सदर गुन्ह्यात दि.06/11/2022 रोजी अटक केली.व सदर गुन्ह्यास वाढीव कलम 376,(2), (एन), 366, बालकांचे लैंगीक अपराध पासून संरक्षण अधि.2012 चे कलम 4,8,12 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.सदर गुन्ह्यास अनुसुचीत जाती जमाती अधि.3(1)(W)(i)(ii)3(2) (y-a) हे वाढीव कलम लावण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे हे करीत आहेत.सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख,पोहेकाँ/46 रेवननाथ दहीफळे,पोकाँ/2662 रमेश दरेकर,पोना/भानुदास खेडकर,/पोना/राहुल द्वारके यांनी केली आहे.