अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अखेर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय.

Ahmednagar Breaking News
0

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अखेर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय.



मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून ज्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापलं होतं, अखेर त्याच पोटनिवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीदरम्यान भाजपवर उमेदवार मागे घेण्याबाबतचा दबाव वाढल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता. पण या पोटनिवडणुकीच्या रणांगणात भाजप उमेदवार असता तर ही निवडणूक अटीतटीची ठरली असती. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही भाजप वगळता इतर उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ना ठरता या जागेसाठी मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचाच विजय जवळपास निश्चित झालाय. ऋतुजा लटके यांना मतमोजणीच्या तेराव्या फेरी अंती 48 हजार 15 मतं मिळाली आहेत.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top