आझाद मैदानावरील शिक्षक बांधवांना न्याय मिळाला, आपल्या प्रयत्नांना यश.- आ.किशोर दराडे.

Ahmednagar Breaking News
0

आझाद मैदानावरील शिक्षक बांधवांना न्याय मिळाला, आपल्या प्रयत्नांना यश.- आ.किशोर दराडे.

 नगर,प्रतिनिधी.(२२. नोव्हेंबर.) : गेल्या ४० दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या शिक्षकांच्या लढ्याला यश आले आहे. माझ्यासह सर्व शिक्षक व पदवीधर आमदार, शिक्षक समन्वय संघ व अघोषित महासंघ यांनी दिलेला लढा आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. दीपक केसरकर साहेबांनी राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना ११६० कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासनही मा. शिक्षणमंत्री महोदयांनी दिले आहे. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ६० हजार शिक्षकांना लाभ होणार आहे, असे आ.किशोर दराडे यांनी सांगितले.

             मा. शालेय शिक्षणमंत्री महोदयांच्या या निर्णयाचे स्वागत आहेच, परंतु शासनाने या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून या सर्व शिक्षक बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी देखील मी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top