अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या नूतन दालनाचा भव्य शुभारंभ आमदार संग्राम जगताप आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न होणार.
नगर,प्रतिनिधी. (३०. नोव्हेंबर.) : सावेडी उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रोड लगत अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या नूतन दालनाचा भव्य शुभारंभ शुक्रवार 9. डिसेंबर 2022. रोजी दुपारी 12. वाजता आमदार संग्राम जगताप आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे,अशी माहिती अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईटचे संचालक अमोल पुंड यांनी दिली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दालनात बांधकाम क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या इटालियन मार्बल,ग्रॅनाईट,मार्बल, टाइल्स, कोटा, सेनेट्री वेअर, सिपी फिटिंग मिळेल. आता नगरकरांना पुणे मुंबईला जाण्याची गरजच नाही सर्व काही अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या दालनात मिळेल. तरी ग्राहकांनी या दालनाला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन पुंड परिवाराच्या वतीने करण्यात आले.