महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन.- पाणी जपून वापरा. पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत.
नगर, प्रतिनिधी.(२३ नोव्हेंबर) : अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर,विळद पंपिंग स्टेशन येथे तसेच विळद जलशुध्दीकरण केंद्र परिसरातील बु-हाणनगर आणि चाळीसगाव योजनेच्या उपसा केंद्रावर बिघाड झाला आहे.त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीसाठी आज वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.तो रात्री उशिरापर्यंत सुरू न झाल्याने पाणी उपसा बंद राहणार आहे.गुरुवारी दि.२४ नोव्हेंबर रोजी कमी दाबाने या ठिकाणी पाणीपुरवठा होणार शहरातील स्टेशन रोड,आगरकर मळा,विनायकनगर,कायनेटीक चौक परिसर, लक्ष्मी कृपा हाउसिंग सोसायटी,प्रियंका कॉलनी या भागाला आज होणारा पाणीपुरवठा उद्या (गुरूवारी) नियमित वेळेत होईल.परंतु अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागात तोफखाना,सिध्दार्थनगर, लालटाकी,दिल्लीगेट,नालेगाव,चितळे रोड, माणिकचौक,आनंदी बाजार,नवी पेठ,कापडबाजार या भागाला उद्या (गुरूवारी) रोटेशन नुसार उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
शुक्रवारी दि.२५ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी पाणीपुरवठा निमित वेळेत होईल.
सारसनगर,बुरूडगाव रोड भागाला गुरूवार ऐवजी शुक्रवारी (ता.२५) नियमित वेळेत,तर मंगलगेट,रामचंद्रखुंट,झेंडीगेट,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,दाळमंडई,काळू बागवान गल्ली,धरती चौक,माळीवाडा,कोठी या भागात आणि गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर,सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको,म्युनिसीपल हाडको या भागाला शुक्रवारी (ता. २५) नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा होईल.
याठिकाणी उशिराने पाणीपुरवठा होईल मुकुंदनगर,लक्ष्मीनगर,अर्बन बँक कॉलनी,निर्मलनगर, सूर्यनगर,शिवाजीनगर या उपनगरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल.