तुलसी विवाहाच्या मुहूर्तावर अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प.
स्नेहालय द्वारा उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान....
अहमदनगर प्रतिनिधी. (3. नोव्हेंबर.) :हिंदू धर्मात लग्न हा खूप पवित्र आणि आनंदाचा सोहळा मानला जातो. त्यामुळे साहजिकच लग्नासाठी विशेष मुहूर्त पाहिले जातात आणि त्याच मुहूर्तांना लग्न लावले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आपल्या कडे लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात तुळशीच्या लग्नापासून केली जाते. या नंतर लग्नसराई सुरू होते. तुळशी विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाच्या तारखा निघतात. त्यामुळे येणाऱ्या काळातही बालविवाह होण्याची शक्यता टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प स्नेहालय द्वारा उडान बालविवाह प्रतिबंधक अभियाना च्या माध्यमातून घेतला आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील उडान हा प्रकल्प मागील तीन वर्षापासून सर्व सरकारी यंत्रणांना सोबत घेऊन अनेक बालविवाह थांबवण्यात आले आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, अहमदनगर चाईल्ड लाईन, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी आणि ग्रामसेवक, सर्व अंगणवाडी सेविका, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील बालसूरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच व नगरसेवक सदस्य पोलीस पाटील, शिक्षक, जिल्ह्यातील सर्व बालसेवी संस्थेचे कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र व न्यूज चैनल चे संपादक आणि त्यांचे प्रतिनिधी हे सर्व अहमदनगर जिल्ह्यात सक्रियरित्या काम पाहत आहे. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, कुठेही अठरा वर्षाच्या आतील मुलीचा किंवा 21 वर्षाचा आतील मुलाचा विवाह म्हणजेच बालविवाह होत असेल तर, चढल्यांच्या उपक्रमांक 1098 यावर माहिती देऊन तो बालविवाह थांबून उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानामध्ये सहभाग नोंदवावा.