नगर तालुक्यातील सारोळा कासार व खंडाळा हद्दीत शेळ्या चोरणारी टोळी सक्रिय.

Ahmednagar Breaking News
0

नगर तालुक्यातील सारोळा कासार व खंडाळा हद्दीत शेळ्या चोरणारी टोळी सक्रिय.

अहमदनगर, प्रतिनिधी. (दि.२६ नोव्हेंबर) : नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सारोळा कासार व खंडाळा तालुका नगर येथून अज्ञात चोरट्याने ३३,००० रू. किमतीच्या शेळ्या चोरून नेल्या आहे.याबाबत नामदेव एकनाथ कडुस (वय ४२ धंदा शेती रा.सारोळा कासार ता.नगर,जि.अहमदनगर) यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कुणीतरी अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाच्या दोन शेळ्या व हरणासारखे शिंग असलेली एक शेळी असे एकूण तीन शेळ्या चोरट्याने चोरून नेल्या आहेत.

            याबाबत तालुका पोलीस स्टेशनला गुरक्र/ ८२७/२०२२ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तसेच दुसऱ्या घटनेतील सौ.शोभा सुभाष कारले (रा.खंडाळा ता.नगर, जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमाने त्यांच्या तीन शेळ्या चोरून नेल्या आहे यावरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुरक्र/८२८/२०२२ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top