गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे चंद्रकांत मोरे यांची तपोवनरोड येथील स्वामी समर्थ केंद्रास सदिच्छा भेट.

Ahmednagar Breaking News
0

गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे चंद्रकांत मोरे यांची तपोवनरोड येथील स्वामी समर्थ केंद्रास सदिच्छा भेट.

 नगर प्रतिनिधी.- तपोवन रोडवरील तपोवन श्री स्वामी समर्थ केंद्रास त्र्यंबकेश्वर येथील गुरुपिठाचे आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांतदादा अण्णासाहेब मोरे यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी 27 डिसेंबर 2022 ला भव्य दिव्य सत्संग मेळावा या केंद्रात होणार आहे. त्यानिमित्याने जागेची पाहणी केली. जिल्हा प्रतिनिधी संजय कलाने, खेमनार, लोळगे, तसेच तपोवन केंद्राचे सेवेकरी यांच्याशी चर्चा केली.

ज्येष्ठ सेवेकरी एकनाथ खिलारी यांच्या निवासस्थानी चंद्रकांत दादा यांनी भेट दिली. खिलारी परिवाराने त्यांचे स्वागत करुन पाद्यपुजन केले. दर्शनाचा लाभ घेतला व सत्कार करुन मोरे यांना पुढील महिन्यात होणऱ्या सत्संग मेळाव्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी कौशल्या खिलारी, श्रद्धा खिलारी, अभिषेक खिलारी, जयश्री डांगे, सुवर्णा खिलारी, अभिनंदन, अनुष्का, आरोव आदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top