गोरगरीब रुग्णांसाठी खा.सुजय विखे पाटील ठरले देवदूत.'श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट'ला दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे 200 रुग्णांना मिळाली विनामूल्य सेवा.

Ahmednagar Breaking News
0

गोरगरीब रुग्णांसाठी खा.सुजय विखे पाटील ठरले देवदूत.'श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट'ला दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे 200 रुग्णांना मिळाली विनामूल्य सेवा.


अहमदनगर,प्रतिनिधी.(२.नोव्हेंबर) : एका पैशाचीही अपेक्षा न करता गोरगरीब रुग्णांच्या जीवनात हास्य फुलवणारे निष्काम कर्मयोगी,खा.सुजय विखे पाटील यांच्यामुळे झाले.अनेक रुग्णांच्या घरात हास्य फुलले त्याचे कारण म्हणजे त्यांनी दिलेली रुग्णवाहिका आणि त्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळालेली सेवा.

            जानेवारी २०२१ मध्ये खा.सुजय विखे पाटील यांनी 'श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट 'ला एक रुग्णवाहिका भेट दिली होती. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 'श्री साई द्वारका सेवा ट्रस्टने' गोरगरीब गरजू रुग्णांना विनामूल्य सेवा दिली.अपघातग्रस्तांना तसेच आजारी असलेल्या रुग्णांसाठी मागील दोन वर्षांपासून विनामूल्य सेवा देणारी 'श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट' रुग्णांसाठी देवदूत ठरत आहे.कोरोना महामारीने मागील तीन वर्षापासून संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या सांसर्गिक रोगाने नाती दुरावली,गाव दुरावले,असे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे    आपले-आपले म्हणणारे देखील या कोरोनाच्या भितीने लांब गेले.घरातील व्यक्ती अशा वेळी सगळे पाठ फिरवत असतानाच या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी माजी नगरसेवक धनंजय जाधव पुढे आले, आणि 'श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट' माध्यमातून त्यांनी ही सेवा दिली आहे.

               खा.सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या या रुग्णवाहिकेला  दोन वर्षे पूर्ण झाल्या बद्दल 'श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी खा.सुजय विखे पाटील यांना आभार पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.अहमदनगर शहरात कोणताही मोबदला न घेता रुग्णालयांत घेऊन जाण्याची विनामूल्य सेवा देण्याचे कार्य अविरत सुरूच आहे.तर परगावी जाण्यासाठी अगदी नगण्य रक्कम अकारून सेवा देण्यात येते.अनेक वेळा गोरगरीब नागरिकांना घरीच त्रास होतो अशा वेळी रुग्णवाहिकेसाठी पैसेही नसतात. मात्र अशा रुग्णांच्या नातेवाईक मित्रांनी फोन केला तर त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी 'श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट' माध्यमातून उपलब्ध असणारी रुग्णवाहिका करत असून आतापर्यंत साडेतीनशे ते चारशे रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचणे ही महत्त्वाची गरज असल्याने ती सेवा विनामूल्य खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळालेल्या रुग्णवाहिकेमुळे आम्ही देत आहोत असे माजी नगरसेवक  धनंजय जाधव यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top