प्रशांत खैरे यांची नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांच्या रिक्तपदी नियुक्ती.

Ahmednagar Breaking News
0

 प्रशांत खैरे यांची नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांच्या रिक्तपदी नियुक्ती.

नगर,प्रतिनिधी.(८. नोव्हेंबर.) : सोमवारी रात्री राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्याबाबत आदेश काढले. रिक्त असलेल्या नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नागपूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नियुक्ती झाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची सिंधुदुर्ग येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यानंतर ती जागा रिक्त होती. सोमवारी रात्री काढलेल्या आदेशामध्ये मागील महिन्यात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पोलीस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली आहे. मागील महिन्यात  तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या जागी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top