केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर- न्यू आष्टीची डेमो सेवेच्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ.

Ahmednagar Breaking News
0

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर- न्यू आष्टीची डेमो सेवेच्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ.

अहमदनगर प्रतिनिधी (१७. नोव्हेंबर.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या कामांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याला चालु वर्षात 11 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.दौंड ते मनमाड,नगर -बीड-परळी या मार्गाचे काम वेगाने पुर्ण करण्याबरोबरच राज्यात रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

            नगर ते पुणे या डेमू रेल्वेसाठी तांत्रिक बाबींची तपासणी करुन ही रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.अहमदनगर- न्यू आष्टी या डेमूच्या अतिरिक्त सेवेचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे यांच्या हस्ते अहमदनगर रेल्वे स्थानक येथे आज हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.          

             व्यासपीठावर खासदार डॉ.सुजय विखे पाटील, बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे,आमदार बबनराव पाचपुते, आष्टीचे आमदार सुरेश धस,जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अलोक सिंग, निरज दोहरे,मा.महापौर बाबासाहेब वाकळे,भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,भैय्या गंधे, मा.उपमहापौर मालनताई ढोणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून नगर-बीड-परळी या मार्गाला मंजुरी मिळाली आहे.  261 किलोमीटर असलेल्या या रेल्वे मार्गापैकी नगर ते आष्टीपर्यंतच्या 66 किलोमीटरचे काम पुर्ण करण्यात आले असुन डिसेंबर, 2023 पर्यंत बीडपर्यंतचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याचेही श्री.दानवे यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रेल्वे राज्यमंत्री श्री.दानवे यांनी घेतला रेल्वेच्या कामांचा आढावा तत्पूर्वी केंद्रीय रेल्वे,कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रेल्वेच्या प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना केल्या.या बैठकीस उपस्थित नागरिकांनी रेल्वेच्या असलेल्या समस्या राज्यमंत्री महोदयांसमोर मांडल्या. श्री. दानवे यांनी उपस्थितांच्या समस्या ऐकून घेऊन नागरिकांच्या रेल्वेबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top