अध्यात्म मार्ग, धर्माचरण हाच मुक्तीचा मार्ग हा संदेश शंकर महाराजांनी दिला - नगरसेवक सुनिल त्र्यंबके.
नगर, प्रतिनिधी. (02. नोव्हेंबर.) : अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना आपले अध्यात्मिक पिता मानणार्या शंकर महाराज यांना सिद्धी प्राप्त होती, पण लोक त्याला चमत्कार समजत असले तरी त्या महाराजांच्या लिला असत. भगवंत स्मरणात लीन रहा, तुम्हाला इतर चमत्काराचं आश्चर्यच वाटणार नाही. आध्यात्म मार्ग, धर्मारचण हाच मुक्तीचा मार्ग आहे. हा संदेश संपूर्ण जगाला शंकर महाराजांनी दिला, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
तपोवन रोडवरील शिवाजी महाराज चौकात भव्य प्रतिमेची श्री शंकर बाबा महाराज यांच्या प्रगटदिनी महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पै.प्रताप गायकवाड, पै.अक्षय भवर, बबलू सूर्यवंशी, ग्रा.पं.सदस्य विशाल सूर्यवंशी, डॉ.दिपक दरंदले, शुभम पांडूळे, गणेश चौधरी, जाहीद शेख, प्रदिप गायकवाड, राहूल चौधरी, अजय चाफेकर, धनंजय डहाळे, सोनू शिंदे, वैष्णव शिंदे, दर्शन घोरपडे, गणेश जगधने, प्रदीप चाबुकस्वार आदिंसह भाविक उपस्थित होते.
श्री.त्र्यंबके पुढे म्हणाले, शंकर महाराजांच्या भक्त समुदायात सर्व जाती-धर्माचे भक्त होते. महाराजांची सेवा करायला, आशिर्वाद घ्यायला जाती-धर्माची कवच आड येत नसत. महाराजांच्या भक्तगणात अनेक मुस्लिम भक्तगण होते; त्यांना महाराज नियमित नमाज पढत जा, असे उपदेश करायचे. अशा या शंकर बाबांच्या खूप कथा आहेत.
यावेळी महाआरती झाल्यावर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. पै.प्रताप गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने प्रकटदिन साजरा करुन प्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केले.