आर जे गिरीराज जाधव यांच्या आवाजात सदगुरु.श्री.शंकर महाराजांची गीता आता ऑडिओ रुपात युट्यूबवर.
अहमदनगर, प्रतिनिधी. (१३. नोव्हेंबर.) : येथील प्रथितयश गायक आणि आर जे गिरीराज जाधव यांनी सदगुरू श्री.शंकर महाराजांची श्री शंकर गीता ऑडिओ रुपात रेकॉर्ड केली आहे.अध्यात्म आधार (Adhyatm Aadhar) या युट्यूब चॅनलवर ही गीता भक्तांना आता ऐकता येणार आहे.शंकर महाराजांचे भक्त सर्वदूर पसरलेले आहेत,जसं गीतेचं पारायण करून लोकांना फायदा होतो,तसाच ऐकून सुद्धा होतो,तसे अनुभवही लोकांना आलेले आहेत.शिवाय ज्या लोकांना वाचता येत नाही किंवा शारीरिक व्याधींमुळे बसून पारायण करता येत नाही,अश्यांसाठी ही ऑडिओ रुपातली शंकर गीता फार फायद्याची ठरू शकते. युट्युबवर जाऊन खालील लिंक ओपन केल्यास आपणास 19 अध्याय ऐकण्यास मिळतील. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन आर जे गिरीराज यांनी केले आहे.
https://youtube.com/playlist?list=PLF3AqZqZcHMqhbQTSl70jJRLqBvue4W_T
गीतेचं ऑफिशियल लॉंचिंग गुरुवर्य. श्री. अशोक दादा यांच्या हस्ते केडगाव येथील श्री.शंकर महाराजांच्या मठात करण्यात आलेले आहे,शिवाय धनकवडी येथील मठात, जिथे शंकर महाराज समाधिस्त आहेत,तेथे सुद्धा लवकरच लॉंचिंग करण्याचा मानस गिरीराज यांचा आहे.या गीतेला ऑडिओ रुपात साकारण्यासाठी पुणे येथील फेमस रेकॉर्डिस्ट आणि बासरी वादक श्री.सत्यजित केळकर यांचे विशेष सहकार्य लाभले,संपूर्ण पोथी त्यांच्या स्टुडिओमधेच रेकॉर्ड केल्याचं गिरीराज यांनी सांगितलं.तसेच दीपा जाधव-शेळके यांचे सुद्धा मोलाचे योगदान लाभले.ही शंकर गीता सत्यात साक्षात श्री शंकर महाराज यांच्या कृपाशीर्वादानेच येऊ शकली असं आर जे गिरीराज म्हणतात.