तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत चाईल्ड लाईन आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार धाडसत्राचे आयोजन करून सहा बालकामगारांना मुक्त करण्यात आले.
नगर,प्रतिनिधी.(१५. नोव्हेंबर.) : आज रोजी चाईल्ड लाईनने दोस्ती सप्ताहाच्या अनुशंगाने “स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत बालकामगार धाड्सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामधे कृतीदलामार्फत तोफखाना हद्दीतील 6 बालकांना बालकामगारातुन मुक्त करण्यात आले. सदर परीसरातील हॉटेल, गॅरेज, चहा टप-या ई. ठिकाणी सहानिशा करण्यात आली. हॉटेल चालकांना सांगितले कि, जर तुम्ही बालकामगार कामावर ठेवला तर तुमच्यावर कायदेशीर कर्यवाई होईल. अल्पवयीन बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख, वरीष्ठ लिपिक अंबादास केदार, लिपिक प्रकाश भोसले, प्राथमिक शिक्षण विभागाचे अलीम शेख, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाळु साळवे, अहमदनगर चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सुर्यवंशी, चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी शाहिद शेख, राहुल कांबळे, मंजुषा गावडे, अनुजा मुळे, भाग्यश्री जोशी आदी सहभागी झाले होते.
अहमदनगर वासीयांना महत्वाचे आहवान.
• बालमजुरी ही बेकायदेशीर आहे तिला प्रोत्साहन देऊ नका.
• बालमजुरी बंद करा आपल्या मुलाच्या बालपणाचे रक्षण करा.
• चला बालमजुरी हटवुयात तिला मुळा सकट संपवुयात.
• मुलांना शिकवू या बालमजुरी हटवुया.
बालकामगार दिसल्यास संपर्क साधा मोफत क्रमांक 1098.