श्रीक्षेत्र दत्त देवस्थान,देवगड संस्थानचे महंत सदगुरु भास्करगिरी महाराज व त्यांचे वारस श्री प्रकाश नंदगिरी महाराज यांची अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या नूतन दालनास सदिच्छा भेट.
नगर, प्रतिनिधी. (२२. नोव्हेंबर.) : अहमदनगर उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रोड लगत अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या नूतन दालनास श्रीक्षेत्र दत्त देवस्थान,देवगड संस्थानचे महंत सदगुरु भास्करगिरी महाराज व त्यांचे वारस श्री प्रकाश नंदगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन शुभाशीर्वाद दिले. अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट परिवाराच्या वतीने महंत सदगुरु भास्करगिरी महाराज व श्री प्रकाश नंदगिरी महाराज यांचे स्वागत करण्यात आले.
महाराजांच्या वतीने मंत्रोच्चार करून दालनाची नारळ फोडून पूजा करण्यात आली.महाराजांच्या हस्ते सर्वाना प्रसाद म्हणून पेढे वाटण्यात आले. नंतर महाराजांनी सर्व दालन फिरून दालनात काय काय वस्तू भेटतात या बाबत विचारपूस करून त्यांना अमोल पुंड यांनी सर्व माहिती दिली. ते ऐकून त्यांनी नगर शहरातीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहकांना आता इथून पुढे टाइल्स, ग्रॅनाईट,मार्बल आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही असे सांगितले.
यावेळी संजय पुंड,राजेंद्र शेडाळे, अमोल पुंड, तुषार पटेल, गणेश भुजबळ, सारंग बारस्कर, संतोष इंगळे, अमोल सोनवणे,नाना भवर, सुभाष गोरे सर, महेश जरे,सुरज तोडमल, गायके मेजर, तसेच अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट परिवारातील महिला मंडळी उपस्थित होत्या.