वाणी नगर,पाईपलाईन रोड येथील प्रगतशील शेतकरी शंकर भाऊ वाणी यांचे दुःखद निधन.
नगर,प्रतिनिधी. (६ नोव्हेंबर.) : पाईपलाईन रोड येथील रहिवासी प्रगतशील शेतकरी श्री.शंकर भाऊ वाणी (नाना) यांचे ५ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले . ते ६५ वर्षांचे होते. संपूर्ण परिसरामध्ये ते नाना या नावाने परिचित होते. नानांचा सामाजिक कार्याने परिसरात चांगला ठसा उमटला होता. एकदम शांत संयमी पुरुष म्हणून संपुर्ण परिसरात त्यांची वेगळीच ओळख निर्माण झालेली असल्याने आजही प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा असे हे व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.महाकाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन वाणी यांचे नाना चुलते होत, तसेच कालिका कंट्रक्शनचे संचालक संतोष शंकर वाणी यांचे ते वडील होते.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,दोन मुली ,जावई, भाऊ, पुतणे,नातवंडे,असा मोठा परिवार आहे.