बालदिनाचे औचित्य साधून स्नेहालय द्वाराअहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प.

Ahmednagar Breaking News
0

बालदिनाचे औचित्य साधून स्नेहालय द्वाराअहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प.

           एक शपथ... बालविवाह निर्मूलन करण्याची....

 अहमदनगर,प्रतिनिधी.(१३. नोव्हेंबर.) : बालदिनाचे औचित्य   साधून,स्नेहालय द्वारा,उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानांतर्गत अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प करू या.वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी आणि बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यासाठी नवे अभियान सुरू होत आहे. स्नेहालय संस्था ही मागील 30 वर्षापासून वंचित घटकांसाठी अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक समस्या वर खूप चांगला परिणाम घडवून आणण्याचे पुढाकार स्नेहालय संस्थेने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कोरोना पासून उद्भवलेली समस्या बालविवाह या समस्येला मुळापासून नष्ट करण्यासाठी स्नेहालय चे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजू गुजर,अनिवासी प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख,निवासी प्रकल्पाचे संचालक प्रवीण मुत्याल यांच्या  मार्गदर्शनाखाली उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान बालदिनाच्या औचित्य साधून 14 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या एका महिन्यात कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी कोणता प्रयत्न करायला पाहिजे या दृष्टीने वेगवेगळ्या उपक्रमातून उडान अभियान पावले उचलणार आहे. उडान अभियानांतर्गत मागील तीन वर्षांमध्ये 300 पेक्षा जास्त पालीवा थांबवण्याचा विक्रम झाला आहे. तुळशीचे विवाह नंतर लग्नसराईमध्ये धुमधडाका उडणार आहे यासाठी उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान थांबवण्याची मोठ्या संख्येने कामगिरी करण्याचं ध्येय समोर ठेवून आणि अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करून ही समस्या मुळापासून नष्ट करणार आहे. त्यामुळे उद्या सर्व अहमदनगरकरांना बालदिनाच्या निमित्ताने आव्हान करण्यात येते की बालविवाह विरुद्ध लढ्याची देण्याकरिता अहमदनगरकर एक शपथ थांबवण्याची घेऊया.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top