मोबाईलवर विवाहित तरुणीला अश्लील मेसेज पाठवून तिच्या वडिलांना मारण्याची दिली धमकी पोलिसात गुन्हा दाखल.
राहुरी, प्रतिनिधी.(दि.२७ नोव्हेंबर) : विवाहित तरुणीला मोबाइलवर वेळोवेळी अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करून तसेच तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देण्यात आली.याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील ३३ वर्षीय विवाहित तरुणीला आरोपी संदीप मनतोडे हा १७ नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत वेळोवेळी मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवत होता.दरम्यान, तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्या तरुणीच्या वडिलांना त्याने मारण्याची धमकी दिली.या घटनेनंतर सदर तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.तिच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप मारुती मनतोडे (रा.माळेवाडी,ता.संगमनेर) याच्या विरोधात धमकी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.