दिव्यांग बांधवांचे शिर्डी नगरपंचायत समोर आमरण उपोषण सुरू

Ahmednagar Breaking News
0

दिव्यांग बांधवांचे शिर्डी नगरपंचायत समोर आमरण उपोषण सुरू









शिर्डी प्रतिनिधी (१८ नोव्हेंबर):-शिर्डीतील नगरपंचायत समोर दिव्यांग बांधवानी विविध मागण्यांसाठी दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.यामध्ये प्रामुख्याने त्यांची मागणी अशी आहे की दिव्यांगांना व्यवसायासाठी सवलत मिळणेबाबत,तसेच शिर्डी नगरपंचायतने जप्त केलेल्या मालाचे नुकसान भरपाई मिळावी ही प्रमुख मागणी केली आहे.शहरातील सर्व पथविक्रेते यांना उदयोगधंदयासाठी बंदी घालवण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीतील अनेक दिव्यांग बांधव व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.आजपर्यंत दिव्यांग बांधवांसाठी ठोस असा कोणतही निर्णय झाला नाही.नगरपंचायतने उदयोग धंदयासाठी जागा ठरवून व्यवसायासाठी परवानगी देण्यात यावी.तसेच दि. ६/११/२०२२ रोजी तीन दिव्यांगांचा प्रत्येकी २०,०००/- रु.किंमतीचा माल जप्त केलेला परत मिळावा.अन्यथा चालू असलेले आमरण उपोषण तीव्र होईल असा इशारा दिव्यांग बांधवांनी नगरपंचायतला दिलेला आहे.यावेळी प्रहार क्रांती संघटनेचे राहता तालुका अध्यक्ष श्री.नितीन भन्साळी,शिर्डी शहराध्यक्ष श्री.नितीन यादगुडे,कार्याध्यक्ष श्री.संतोष वाघमारे,सचिव श्री.ताहीर सय्यद,श्री.सुरेश गुगळे मा.शहराध्यक्ष शिर्डी इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top