विक्री करण्यास प्रतिबंधित असलेला गुटखा,पान मसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधित असलेला गुटखा,पान मसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्यान विरुद्ध कारवाई केली.

अहमदनगर,प्रतिनिधी.(१६ नोव्हेंबर) : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील टाकळी नाका, येथील महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला व सुगंधी तंबाखु विक्रेत्या विरुध्द कारवाई करून ५,९२,६७८/- रु.किंचा मुद्देमाल  स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.

               मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदारांना बोलावुन घेवुन राहाता, शिर्डी व कोपरगांव परिसरात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास लागलीच रवाना केले.पथक पेट्रोलिंग करुन माहिती घेत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,काही इसम कोपरगांव येवला रोडवरील,टाकळी नाक्या जवळसचिन गुटखा,पानमसाला,सुगंधी तंम्बाकु मारुती कंपनीच्या वॅगनर व ओमनी गाडीमध्ये घेवुन येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहितीमोकळं मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले.पोनि/श्री. अनिल कटके यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अंमलदारांनीसचिन कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोसई/रोहिदास ठोंबरे, पोकॉ/खारतोडे व फड यांचेशी संपर्क करुन त्यांना प्राप्त माहिती कळविली.लागलीच पोसई/ठोंबरे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग,अहमदनगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी व दोन पंचाना बोलावुन घेवून कारवाई करणे बाबत सोबत येण्यास कळविले.पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगांव येवला रोडवरील टाकळीमोकळं नाका येथे जावुन खात्री केली असता मारुती कंपनीची एक राखाडी रंगाची वॅगनर कार व एक ओमनी कार या वाहनांवर छापा घालुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस व तयार करण्यास बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा,पानमसाला,सुगंधी सुपारी व सुगंधी तंम्बाखु वाहनात असलेला दिसल्याने पथकाने वाहनातील इसमांना ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळखी सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी १)वसिम चाँदभाई चौपदार वय ३४, रा.गांधीनगर,कोपरगांव,२) राजमल मिश्रीलाल बोथरा वय ५०,रा.निवारा,हॉ-सोसायटी,कोपरगांव व ३) अर्जुन लक्ष्मण शेळके वय ४५,रा.कोळपेवाडी,ता.कोपरगांव असे असल्याचे सांगितले.त्यांना ताब्यातील वाहन व गुटखा, पानमसाला,सुगंधी सुपारी व सुगंधी तंम्बाखु या बाबत विचारपुस करता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्यास आधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदर माल आमचा असुन आम्ही तो विक्री करण्यासाठी आणला आहे अशी कबुली दिल्याने त्यांना २,८२,६७८/- रु.किंमतीचा विविध प्रकारचा गुटखा,पानमसाला, सुगंधी सुपारी व सुगंधी तंम्बाखु तसेच मारुती कंपनीची राखडी रंगाची १,५०,०००/- रु. किंमतीची वेंगनर व पांढ-या रंगाची १,६०,०००/- रु. किंमतीची ओमनी असा एकुण ५,९२,६७८/- रु.किंमतीचा मुद्देमालासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवून कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील कारवाई कोपरगांव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

             सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,मा.श्रीमती.स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर,श्री. संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग,श्री. अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सफो/मनोहर शेजवळ,पोहेकॉ/ संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,संतोष लोढे,राहुल सोळंके, पोकॉ/सागर ससाणे,रोहित येमुल,रणजीत जाधव, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व भरत बुधवंत यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top