स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई.- महाराष्ट्रात बंदी असलेले गोवंशीय जातीचे ५०००.किलो गोमास जप्त.
नगर,प्रतिनिधी. (२०. नोव्हेंबर.) : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 14,50,000/-(चौदालाख पन्नास हजार रु) रु. किंमतीचे 5,000 (पाच हजार) किलो गोमास व आयशर टेम्पो चिचोंडी पाटील, ता. नगर येथुन जप्त.-स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/संदीप घोडके, दिनेश मोरे, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, संतोष लोढे, पोकॉ/सागर ससाणे, रोहित येमुल व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांना बोलावुन घेवुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तौफिक कुरेशी, अहमदनगर हा त्याचे हस्तका मार्फत अहमदनगर कडुन जामखेडच्या दिशेने एक लाल रंगाचा आयशर मधुन गोवंशीय जातीची जनावरांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने आयशर टेम्पोमधुन वाहतुक करत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन नगर जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे जावुन रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद लाल रंगाचा टेम्पो येताना दिसला, टेम्पो चालकास बॅटरीने लाईट दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने सदर टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला लागलीच पथकातील अंमलदार यांनी टेम्पो चालकास व त्याचे शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने 1) मोहसीन मेहमुद खान वय 40, रा. कोठला, अहमदनगर, 2) सलीम कलीम कुरेशी वय 34, रा. कुरेशी हॉटेल जवळ, अहमदनगर मुळ रा. बहिराईच, बरेली, जिल्हा लखनऊ, राज्य उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष त्याचे आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचे गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली. त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमस हे 3) तौफिक कुरेशी व 4) अब्दुल बारी कुरेशी दोन्ही, अहमदनगर यांचे मालकीचे आहे व गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधुन गोमास विक्री करीता घेवुन चाललो असल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जात 5,000 किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे व वाहतुकीसाठी वापरलेला लाल रंगाचा आयशर टेम्पो असा एकुण 14,50,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर बाबत पोना/1516 रविकिरण बाबुराव सोनटक्के ने. स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन 811/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कारवाई नगर तालुका पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अजीत पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.