आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित हॅपिनेस प्रोग्रॅमची सांगता.
नगर, प्रतिनिधी.(२७. नोव्हेंबर.) : आर्ट ऑफ लिव्हिंग आयोजित हॅपिनेस प्रोग्रॅमची आज सांगता झाली. सहा दिवसांचा हॅपिनेस प्रोग्रॅम म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स आहे.या सहा दिवसात कोर्स मधील भाग घेतलेल्या सदस्यांना काय आणि कसे अनुभव आले, याबाबत शेवटच्या दिवशी चर्चा करण्यात आली. प्रत्येकाने आपल्याला आलेले अनुभव सांगितले.
या सहा दिवसांच्या कोर्समध्ये श्वासावर आधारित सुदर्शन क्रिया शिकवण्यात येते. जागतिक आरोग्य संघटने कडून सुदर्शन क्रियेवर रिसर्च करून अनेक रोगांवर उपचार म्हणून ही क्रिया कार्य करते असे सांगण्यात आले. संपूर्ण विश्वामध्ये करोडो लोक ही क्रिया करून सुखी जीवन जगत आहेत. प्रत्येकाने दररोज सुदर्शन क्रिया केल्यास त्यांच्या जीवनात चांगले अमुलाग्र बदल होण्यास मदत होते,तसेच सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपणास मन शांत, जीवन सुखी, आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
दर रविवारी सकाळी सहा वाजता सहभागी सदस्यांसाठी रिविजन आणि संध्याकाळी सहा वाजता सर्वांसाठी फ्री सेमिनार आर्ट ऑफ लिव्हिंग, ज्ञान क्षेत्र,गावडे मळा,पाईपलाईन रोड, अहमदनगर येथे नियमित चालू आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क.
8999149061/9422220874/9823214215.