स्थानिक गुन्हे शाखेची नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टीवर छापा मारून दोन आरोपीवर कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेची नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध  गावठी हातभट्टीवर छापा मारून दोन आरोपीवर कारवाई.

नगर,प्रतिनिधी.(२४.नोव्हेंबर.) : नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन ०२ आरोपी विरुध्द कारवाई करुन १,५५,०००/- रुपये (एकलाख पचावन्न हजार रु.) किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने २,८०० लि. कच्चे रसायन व १५० लि. तयार दारु नाश. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

          मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि / श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/मनोहर शेजवळ, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ / दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना/ शंकर चौधरी, रवि सोनटक्के, विशाल दळवी, राहुल सोळंके, पोकों/रोहित येमुल, आकाश काळे, सागर ससाणे, व चापोहेकॉ / बबन बेरड यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि. २३/११/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०२ ठिकाणी छापे टाकुन एकुण १,५५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २,८०० लि. कच्चे रसायन, १५० लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ०२ आरोपीं विरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अ.नं.

१.नगर तालुका ८२० / २०२२ मु.प्रो. अॅ.क. ६५ (ई) (फ)

२.पोलीस ठाणे गुरनं व कलम

नगर तालुका ८२१ / २०२२ मु.प्रो. अॅ.क. ६५ (ई) (फ)

आरोपीचे नांव

१) युवराज बजरंग गि-हे, रा. खंडाळा, ता. नगर

१) गणेश पोपट गि-हे, वय ४२, रा. खंडाळा, ता. नगर

३ पुरुष

८०,०००/- रु. किचे १६०० लि. कच्चे रसायन

१०,०००/- रु. किची ५० लि. तयार दारु

६०,०००/- रु. किचे १२०० लि. कच्चे रसायन ५,०००/- रु. किची १०० लि. तयार दारु

१,५५,०००/- रु. कि.ची २,८०० कच्चे रसायन १५० लि. गावठी हातभट्टीची तयार दारु

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top