गावठी कट्टे,सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर पाच जिवंत काडतूस बेकायदेशीररित्या बाळगणारा आरोपी जेरबंद.- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

गावठी कट्टे,सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर पाच जिवंत काडतूस बेकायदेशीररित्या बाळगणारा आरोपी जेरबंद.- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

अहमदनगर प्रतिनिधी.(२९. नोव्हेंबर.) : शिंगवे तुकाई, ता. नेवासा येथे  विक्री करण्याचे उद्देशाने दोन (02) गावठी कट्टे, एक (01) सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व पाच (05) जिवंत काडतुस बेकायदशिररित्या स्वत: तयार करुन कब्जात बाळगणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

         नमुद आदेशान्वये श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आकाशी रंगाचा गोल गळ्याचा टी शर्ट घातलेला एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी शिंगवे तुकाई फाटा, नेवासा परिसरात येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

        नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व चापोना/भरत बुधवंत अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी शिंगवे तुकाई फाटा, ता. नेवासा येथे जावून सापळा लावुन थांबलेले असतांना थोड्याच वेळात एक संशयीत इसम हातामध्ये एक कापडी पिशवी घेवुन शिंगवे तुकाई फाट्याजवळील कमानी जवळ उभा राहुन आजुबाजूस संशसीत नजरेने पाहतांना दिसला. पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमास ताब्यात घेवुन, पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1) शुभम सुभाष सरोदे वय 22, रा. गुंजाळ, ता. राहुरी असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे हातातील पिशवीमध्ये दोन (02) गावठी बनावटी कट्टे, एक (01) सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व पाच (05) जिवंत काडतूसे असा एकूण 86,500/- रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. 

           नमुद इसम हा नेवासा परिसरात चार (02) गावठी कट्टे (पिस्टल), एक  (01) सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व पाच (05) जिवंत काडतूसे विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोना/658 संदीप संजय दरंदले ने. स्थागुशा यांनी सोनई पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोस्टे करीत आहे.

          सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उविपोअ श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top