राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.- दहा महिन्याच्या कालावधीत पाच कोटी रुपयांची अवैद्य दारू जप्त.
"अहमदनगर,प्रतिनिधी (२ नोव्हेंबर): देशी विदेशी दारूचे अवैध विक्री करणे हातभट्टीची दारू निर्मिती करणे तसेच हॉटेल धाब्यावर दारू पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अहमदनगर जिल्ह्यातील" १४ तालुक्यात १ जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्याच्या कालावधीत कारवाई करीत ५ कोटी २२ लाख ३ हजार २४० रुपयांच्या दारूसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत जिल्ह्यात गत दहा महिन्यात ही कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील अशाप्रकारे अवैधरित्या हॉटेल धाब्यावर दारूची विक्री तसेच हातभट्टीसह इतर प्रकारची दारू निर्मिती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले आहे.