न्यायालयाच्या आवारात आरडा ओरडा करून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपीस सरकारी कामात अडथळा व वेगवेगळ्या कलमान्वये भिंगार कॅम्प मध्ये गुन्हा दाखल.

Ahmednagar Breaking News
0

न्यायालयाच्या आवारात आरडा ओरडा करून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या आरोपीस सरकारी कामात अडथळा व वेगवेगळ्या कलमान्वये भिंगार कॅम्प मध्ये गुन्हा दाखल.

नगर,प्रतिनिधी (१५ नोव्हेंबर) : अहमदनगर जिल्हा न्यायालयात राजू मुरलीधर काळोखे. (वय ४२ वर्ष रा.लाल टाकी, सिद्धार्थनगर) याने कोर्टाच्या समोर मोठ मोठ्याने आरडा ओरड करून शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याने तेथे कर्तव्यावर असलेले पोहेकॉ/ अनिल चव्हाण हे त्याला समजून सांगत असताना काळोखे याने फिर्यादी चव्हाण यांच्या तोंडावर चापट मारून ओठाला दुखापत केली.तसेच तेथे उभे असलेले इतर साक्षीदार यांना मारहाण करून लॉकपगार्डचे खिडकीचे काचेला डोक्याने मारून मी आत्महत्या करतो व पोलिसांना कामाला लावतो तसेच माझ्या पत्नीला तुमच्याविरुद्ध विनयभंगाची केस दाखल करायला सांगतो अशी धमकी दिली.सदरील घटना ही १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाच्या आवारात कोर्ट मध्ये घडली आहे.पोहेकॉ/अनिल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरन ५५५/२०२२ भादवीक ३५३,३३२,३०९,५०४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे करीत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top