स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना असलेल्या हुक्का पार्लरवर टाकला छापा.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना असलेल्या हुक्का पार्लरवर टाकला छापा.

संगमनेर,प्रतिनिधी (१७ नोव्हेंबर) : संगमनेर शहराला खेटूनच असणाच्या गुंजाळवाडी शिवारात सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला आहे.नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हा हुक्का पार्लर चालविणाऱ्या संतोष अशोक वांढेकर (रा.लक्ष्मीनगर,गुंजाळवाडी) याच्यासह संकेत नारायण कलंत्री (रा.बाजारपेठ, संगमनेर),गणेश शिवप्रसाद लाहोटी,श्रेयस श्रीकांत मणियार (रा.स्वातंत्र्य चौक,गुंजाळवाडी शिवारातील हॉटेल ‘ग्रीन संगमनेर),ऋषी संतोष आव्हाड (रा. शिवाजीनगर, संगमनेर),अनिकेत चंद्रकांत खोजे (रा. गणेशनगर, संगमनेर), जयनेश धर्मेंद्र शहा (रा.शिवाजीनगर, संगमनेर),सागर मोहन पंजाबी (रा. विद्यानगर,संगमनेर),प्रसाद मयय्या गुंडेला (रा. इंदिरानगर,संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.संगमनेर शहरानजीक असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील हॉटेल ग्रीन लीप शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.त्यानुसार पथकाने मंगळवारी (१६ नोव्हेंबर) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा छापा टाकला. यावेळी २७ हजार रुपयांचे हुक्क्याचे काचेचे व स्टीलचे नऊ पॉट,दोन हजार ६० रुपयांचे १३ रबरी पाइप आणि विविध कंपन्यांचे अर्धवट वापरलेले सुगंधी केमिकलचे डबे व इतर साहित्य असा एकूण ५५ हजार ७५० रुपयांचा मद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर संपत चौधरी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top