अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची यंत्रणा उडाणच्या अभियानात सहभागी होण्यात उत्सुक.- आशिष येरेकर.

Ahmednagar Breaking News
0

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची यंत्रणा उडाणच्या अभियानात सहभागी होण्यात उत्सुक.-  आशिष  येरेकर. 

नगर, प्रतिनिधी (१५. नोव्हेंबर.) : आज रोजी अहमदनगर जिल्हा परिषद येथील ग्रामीण भागासाठी बालका संदर्भात येणाऱ्या जिल्हास्तरावरील यंत्रणांना भेट देऊन तेथील पदधिकारी यांच्यासोबत उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानासंदर्भात सविस्तर चर्चा करून त्यांना अभियान विषयी माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह आणि शाळाबाह्य माध्यमिक शाळा मधील 14 ते 18 वर्षाच्या आतील किशोरवयीन मुली संदर्भात शाळाबाह्य मुलींसोबत कशा प्रकारे चांगले काम करता येईल.  यासंदर्भात जिल्हा परिषद चे माध्यमिक विभाग जिल्हा शिक्षण अधिकारी अशोकजी कडूस साहेब त्यांच्यासोबत बालविवाह प्रतिबंधक अभियाना विषयी चर्चासत्र करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील संपूर्ण माध्यमिक शाळा 1100 शाळांमध्ये बालविवाह या विषयाची जनजागृती कशाप्रकारे करता येईल तसेच अहमदनगर जिल्ह्यात बालकांच्या संदर्भातले कोणत्या समस्या चाईल्ड लाईनच्या मोफत क्रमांक 1098 वर येतात याबद्दल माहिती दिली. त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितल की, अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण शाळेत बालविवाह प्रतिज्ञा दररोज प्राथना मध्ये घेतली जाईल. यामुळे त्या मुलींना बालविवाह विषयी समज गैरसमज दूर होईल. त्यामध्ये बैठकी मध्ये विस्ताराधिकारी कवले  सर उपस्थित होते. त्याचबरोबर अंगणवाडीच्या संपर्कात येण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग भेट देऊन तेथील मनोज जी ससे जिल्हा कार्यक्रम अधिकारी त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी जे अहमदनगर जिल्ह्यातील चार हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांसोबत काम करता येईल यामुळे त्यांनी तालुका स्तरावरील सर्व मदत केली जाईल. सर्व बाल विकास अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आणि यादी उपलब्ध करून दिले. 

त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिषजी येरेकर यांच्यासोबत तब्बल पंधरा मिनिटे बालविवाह प्रतिबंधक अभियानाविषयी चर्चासत्र झाले. आपण कशाप्रकारे अहमदनगर जिल्ह्यात उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून राबवणार आहोत कशाप्रकारे यासंबंधी यंत्रणा येणाऱ्या सर्व यंत्रणांशी समन्वय साधून हा विषय मुळापासून नष्ट करण्याची जिल्हा कृती नियोजना संदर्भात सविस्तर चर्चा करून त्यांची परवानगी घेण्यात आली. तसेच उडान अभियानाकडून त्यांचा जिल्हा परिषदेत च्या हद्दीतील सर्व सरकारी आणि नीट सरकारी कर्मचाऱ्यांना या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावरून सुचित करण्यासाठीची विनंती करण्यात आली. यामध्ये त्यांच्या प्रतिसाद होकर अर्थी असल्याकारणाने त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. आपले स्नेहालयाचे काम त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. यामुळे कोणताही विचाराचा विलंब न करता त्यांनी या अभियानाची सुरुवात करण्यासाठीचा छान प्रतिसाद दिला.  त्यांना अभियानाबद्दल सविस्तर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचे खूप कौतुक केले. व अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन आपल्याला पूर्ण सहकार्य दिल अशी आश्वासन देऊन त्यांनी आपले शुभेच्छा दिली.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top