स्थानिक गुन्हे शाखेची नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारूवर कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

स्थानिक गुन्हे शाखेची नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारूवर कारवाई.



नगर,प्रतिनिधी. (३,नोव्हेंबर): नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन ०२आरोपी विरुध्द कारवाई करुन १,३८,५००/- रुपये (एक लाख आडवतीस हजार रु.) किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने,२,४०० लि.कच्चे रसायन व १८५ लि.तयार दारु नाश स्थानिक गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई केली आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/बबन मखरे,विजयकुमार वेठेकर,देवेंद्र शेलार,पोना/शंकर चौधरी,संदीप दरंदले,पोना/ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे,चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.०२/११/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०२ ठिकाणी छापे टाकुन एकुण १,३८,५००/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २,४०० लि.कच्चे रसायन,१८५ लि.गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे ०२ आरोपी विरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-०२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

१)पोलीस ठाणे गुरनं व कलम नगर तालुका ७५७/२०२२ मु.प्रो.अॅ.क. ६५ (ई)(फ)

२)नगर तालुका ७५८/२०२२ मु.प्रो. अॅ.क. ६५ (ई) (फ)

आरोपीचे नाव

१) युवराज बजरंग गि-हे रा.खंडाळा,ता.नगर जि.अहमदनगर.

2) गणेश पोपट गि-हे रा.खंडाळा,ता.नगर जि.अहमदनगर.

जप्त मुद्येमाल. 

६५,०००/- रु.किचे १३०० लि. कच्चे रसायन

१२,५००/- रु. किची १२५ लि. तयार दारु

५५,०००/- रु. किचे ११०० लि. कच्चे रसायन

६,०००/- रु.किची ६० लि. तयार दारु

१,३८,५००/- रु.कि.ची २,४०० कच्चे

रसायन १८५ लि.गावठी हातभट्टीची तयार दारु

                  सदरची कारवाई मा.डॉ.श्री.बी.जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक मा.श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर,अतिरीक्त कार्यभार अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top